

पुढे वाचा..

१८८८ साली मुरुड नगरपरिषदेची स्थापना नवाब काळातच झाली होती. १८७९ साली जंजिरा संस्थानाचे नवाब म्हणून विराजमान झालेल्या सिद्दी अहमदखान यांनी शहरास एक आधुनिक शहर म्हणून मान्यता देणार्या सुधारणा केल्या. लोकांच्या सोयीसाठी त्यांच्याच काळात सगळ्या संस्थानच्या कचेर्या मुरुड शहरात आल्या.
मुरुड-जंजिरा म्हटला की अभेद्य व अजिंक्य जंजिरा किल्ला व शहराचा अडीच कि.मी. अंतरापर्यंत पसरलेला अवर्णनीय समुद्रकिनारा असे केवळ पर्यटकच नव्हे तर निसर्गाशी जवळीक न साधलेले, इतिहासात जाणीवपूर्वक न डोकावलेल्या सर्वांना तसेच वाटते. परंतू मुरुडच्या अवतीभवती पाहिल्यास इथे सगळा परिसर मनसोक्त फिरण्यास किमान एक आठवडा लागेल.
पुढे वाचा..
'मुरुड-जंजिरा' हे शब्द कानी पडताच डोळ्यासमोर उभा रहातो तो सागर लाटांशी लाडिवाळपणे खेळणारा निळाशार अरबी समुद्र, हळुवारपणे बागडावी अशी सोनेरी वाळूमय चौपाटी, नम्रपणे गगनाचे वेध घेणार्या हिरव्या नारळी पोफळीच्या बागाम आपण मुरुडला भेट दिल्यची साक्षीदार असलेली लालभडक माती, माणिकमोत्यांनी भरलेली पिवळीशार शेतजमीन..
पुढे वाचा..
मुरुड-जंजिरा या नावातच अनेक शतकांचा इतिहास दडलेला असून निसर्गाचे वरदान लाभलेल्या या शहरात नारळी पोफळीच्या बागांतून घुमणारा मस्त मोकळा वारा, आकाशाला भिडणारे डोंगर, क्षितिजातून झेपावत येणार्या समुद्राच्या लाटा आणि किनार्यावर वसलेल्या शांत निसर्गरम्य मुरुडमध्ये येत्या २४ डिसेंबर २०१० पासून पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढे वाचा..

